मराठी भाषा दिनाच्या प्रीत्यर्थ, नागपूरच्या प्रख्यात साहित्यकारांची ओळख!

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

nagpur, literature, marathi bhasha diwas, marathi literature, poetry, orater, theatre, plays, writers, speakers, poets, mahesh elkuchwar, asha tai pande, ram shewalkar, kavi grace, bhausaheb patankar, suresh bhat, maruti chitampalli
Reacho_Header

माझ्या मातीचे गायन

तुझ्या आकाश श्रुतींनी

जरा कानोसा देऊन

कधी ऐकशील का रे?

माझी धुळीतील चित्रे

तुझ्या प्रकाश नेत्रांनी

जरा पापणी खोलून

कधी पाहशील का रे?

माझ्या जहाजाचे पंख

मध्यरात्रीत माखले

तुझ्या किनाऱ्यास दिवा

कधी लावशील का रे?

माझा रांगडा अंधार

मेघामेघांत साचला

तुझ्या उषेच्या ओठांनी

कधी टिपशील का रे?

असं म्हणत म्हणत कविवर्य कुसुमाग्रज आपल्या सगळ्यांना मराठी भाषेच्या प्रेमात पाडत गेले ! त्यांच्या  कवितेतला अर्थ शोधत शोधत माझ्या सारखे अनेक साहित्यप्रेमी लहानाचे मोठे झाले. त्यांच्या कविता आणि  त्यांच्या नाटकांतून  वि वा शिरवाडकर मराठी साहित्याला एक नवीन वळण देऊन गेले. आपल्या लेखणीतून, शिरवाडकर आयुष्याचं शब्दांशी असलेलं सुंदर नातं दर्शवितात.

अशा ह्या शब्दांच्या कारागिराची आज जन्मतिथी आहे. अवघा महाराष्ट्र आजचा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो. मराठी भाषा जरी एक असली तरी राज्यभरात ती वेगवेगळ्या ठसक्यात बोलली जाते. भाषेच्या या वेगवेगळ्या ठस्क्यांचा आनंद आपण लोकसाहित्याच्या माध्यमातून घेऊ शकतो.

म्हणूनच मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपण नागपूरच्या काही नावाजलेल्या साहित्यकारांचा परिचय करून घ्यावा असा आम्ही विचार केला !

महेश एलकुंचवार

नाटकात रस असलेला असा एकही व्यक्ती नसेल ज्यानी एलकुचवारांचे नाव ऐकले नसेल. ‘सुलतान' या पहिल्या एकांकिकेने आपल्या काव्यात्म नाट्यप्रतीभेकडे जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या एलकुंचवारांनी त्यांच्या कारकिर्दीत तब्बल २० नाटकं लिहिली आहेत.

मारुति चितमपल्ली

निसर्ग लेखनात रस असलेल्या व्यक्तींसाठी मारुती चितमपल्ली हे नाव वावगे नाही. त्यांच्या गोष्टीं मधल्या प्राण्यांच्या छोट्या छोट्या सवयींच्या सूक्ष्म निरीक्षणातून त्यांचे निसर्गा प्रतीचे प्रेम आणि अभ्यास दिसून येतो. प्राणी आणि जंगला बद्दलच्या त्यांच्या कथा आपल्याला माणसांबद्दल सुद्धा खूप काही शिकवून जातात.

राम शेवाळकर

राम शेवाळकरांचे नाव ऐकले कि त्यांची रामायण आणि महाभारतावरची व्याख्याने आठवतात. ज्ञानेश्वरांच्या पसायदानाला सामान्य माणसापर्यंत पोहोचवणाऱ्या शेवाळकरांच्या लेखणीत सरस्वतीचा वास होता.

आशा ताई  पांडे

कवयित्री आशा ताई पांडे या विदर्भातल्या पहिल्या मराठी महिला गझलकार आहेत. मराठी बरोबरच हिंदी, उर्दू, इंग्रजी आणि संस्कृत वर प्रभुत्व असलेल्या आशाताई त्यांच्या गझलांच्या माध्यमातून भावनांना शब्द देतात.

कवी ग्रेस

माणिक सीताराम गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांच्या कवितांबद्दल जितकं बोलू तितकं कमी आहे ! सोप्या शब्दांच्या आड गहन अर्थ लपवणारे कवी ग्रेस आपल्या कवितांनी समाजाशी संवाद साधतात.

वासुदेव वामन पाटणकर

पेशाने वकील असलेले भाऊसाहेब पाटणकर कोर्टाबाहेर आपली प्रतिभा शब्दांच्या माध्यमांनी गाजवत. मराठी भाषेत गझल लिहिण्याची परंपरा भाउसाहेबांनी सुरु केली. मराठी बरोबरच, उर्दू भाषेवर सुद्धा त्यांचे प्रभुत्व होते.

सुरेश भट

सुरेश भटांच्या गझल आणि कवितांबद्दल काही बोलणं म्हणजे सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखे आहे. शब्दाचं सोनं करण्याची कला सुरेश भटांच्या लेखणीत होती !

Cover image source: modeindia, poemhunter, alchetron


Like our facebook page to stay updated. You can also download Reacho app on Android or iOS to get interesting stories at your fingertips.

News Entertainment Food Travel World Events Nagpur Pune Reacho

Manali Kulkarni (WRITER)

Manali Kulkarni writes for Reacho. If you wish to get in touch with them, drop in a mail at reach@reacho.in

Reacho_Body